Nipani crime news: गडहिंग्लज साखर कारखान्यातील कामगाराचा दगडाने ठेचून खून; नेमकं कारण काय?

निपाणीजवळील घटना : मृत व्हळेहिटणी येथील; ईदच्या दिवशीच खून झाल्याने परिसरात खळबळ
Gadhinglaj sugar factory worker
महंमद शमशेर खलीफpudhari photo
Published on
Updated on

Gadhinglaj sugar factory worker murder

निपाणी : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या तवंदी गावच्या रस्त्यावर दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कामगाराचा निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. महंमद शमशेर खलीफ (वय ५२, रा. व्हळेहिटणी, ता. गडहिंग्लज) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे.

ईद-उल-मिलादच्या दिवशीच हा खून उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेऊन तपास सुरू केला असून, हा खून नेमक्या कोणत्या कारणातून झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Gadhinglaj sugar factory worker
Mumbai Crime News: अश्‍लील व्हिडीओ व्हायरलची धमकी देत ७५ लाखांची वसुली; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

तवंदी येथील नागरिकांना गावच्या वळनावरील विहिरीजवळ एका पुरुषाचा रक्ताने माखलेला मृतदेह दिसून आला. त्यांनी याची माहिती निपाणी ग्रामीण पोलिसांना दिली. माहिती मिळताच घटनास्थळी डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी. एस. तळवार, पोलीस उपनिरीक्षक शिवराज नायकवडी यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. त्यांनी पाहणी करून रितसर पंचनामा केला व मृतदेह उत्तरस्तरीय तपासणीसाठी (शवविच्छेदनासाठी) तातडीने सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात हलवून मृत कामगाराची ओळख पटवली.

मृत खलीफ हे गावातील बसवेश्वर सेवा संस्थेचे संचालक होते. त्यांचे वडील माजी सरपंच असून त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली आणि भाऊ असा परिवार आहे.

दरम्यान, जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन यांनी घटनास्थळी भेट देऊन या गुन्ह्याचा शिताफीने तपास करण्याच्या सूचना स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार काही संशयितांना ताब्यात घेऊन हा खून नेमक्या कोणत्या कारणातून झाला, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

Gadhinglaj sugar factory worker
Crime news : धर्मांतरासाठी दबाव...कुटुंबातील तिघांनी जीवन संपवण्‍यामागील घटनेचे गूढ अखेर उकलले, रायफल शुटिंग कोच अटकेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news