

निपाणी : येथील पार्वती कॉर्नरजवळ रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास धावत्या दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेत दुचाकी पूर्ण जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.
प्रदीप लंबे यांची ही दुचाकी असून मुलगा आरव याच्यासमवेत बाजारपेठेतून दुचाकीवरून (शिवबसव नगर) येथे घरी परतत असताना पार्वती कॉर्नरजवळ अचानक दुचाकीने पेट घेतला. दुचाकीने पेट घेतल्याचे लक्षात येताच नागरिकांनी त्यांना सावध केले. त्यामुळे त्यांनी तातडीने दुचाकी रस्त्याच्या बाजूला थांबवली.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.