निपाणी : शहबाहेरील हरीनगर परिसरातील विद्युत खांबावरील वायर कुरतडणारा सरडा. )फोटो:अक्षय चौगुला)
निपाणी : शहबाहेरील हरीनगर परिसरातील विद्युत खांबावरील वायर कुरतडणारा सरडा. )फोटो:अक्षय चौगुला)

सरड्यामुळे निम्म्या निपाणी शहराला राहावे लागले अंधारात

Published on

निपाणी : पुढारी वृत्तसेवा – पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर सरडे बाहेर पडले असून विजेच्या वायरला देखील त्यांनी आपले लक्ष केले आहे. विद्युत खांबावर टोकावर जाऊन पिन इन्सुलटरची वायर अशा पद्धतीने ते कुरडत आहेत की, सहजासहजी कुठल्याही कर्मचाऱ्याला ही वायर कुरतडल्याचे दिसून येत नाही. कर्मचाऱ्यांनी शोध घेतला. काही हुशार कर्मचाऱ्यांनी सरडा वायर कुरतडताना फोटो काढून अधिकाऱ्यांना दाखवला. हा प्रकार शहराबाहेरील हरीनगर येथे नुकताच उघडकीस आला.

सरड्याने वायर कुरतडल्यामुळे निपाणी निम्मे शहर सोमवारी मध्यरात्री १ ते मंगळवारी सकाळी ९ नऊपर्यंत ८ तास अंधारात राहिले. याचा सर्वाधिक फटका शहराबाहेरील गांधी हॉस्पिटल ते आंदोलननगर परिसरातील उपनगरांना बसला. यावेळी तब्बल ८ तासानंतर खंडीत झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यात निपाणी हेस्कॉम विभागाला यश आले.

गेल्या महिन्याभरापासून निपाणी शहर व परिसरात हंगामातील पाऊस सुरू आहे. दरम्यान या पावसाची सद्यस्थितीत उघडझाप आहे. दरवर्षी पावसाळ्यात अडगळीच्या जागेत लपलेले सरडे व इतर प्राणी बाहेर येतात. दरम्यान हेस्कॉमने गेल्या महिन्याभरापासून विद्युत खांबावरील तारांना लोंबकळणाऱ्या व अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या व इतर अडथळे काढून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम चालू ठेवले आहे.

अधिक वाचा-

दरम्यान सोमवारी मध्यरात्री अचानकपणे गांधी हॉस्पिटल येथील टीसीवर स्पार्क होऊन शहराबाहेरील जवळपास पाच ते सहा उपनगरांचा वीज पुरवठा अचानकपणे खंडीत झाला. यामध्ये गांधी हॉस्पिटल, हुडको कॉलनी, श्रीनगर, संभाजीनगर, प्रगतीनगर, आंदोलननगर आश्रयनगर या उपनगराचा समावेश होता.

अधिक वाचा-

दरम्यान रात्री १ पासून सकाळी सातपर्यंत हेस्कॉमच्या अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांनी खंडीत झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. अखेर आठच्या सुमारास हेस्कॉमच्या चाणाक्ष कर्मचाऱ्यांनी अखेर हरीनगर येथे एका विद्युत खांबावर इन्सुलटरची पिनची वायर कुरतडणाऱ्या सरड्याचा फोटो घेत खंडीत झालेला वीज पुरवठा शोधून काढला. त्यानंतर तब्बल ८ तासानंतर खंडीत झालेला वीज पुरवठा सुरळीत केला.

अधिक वाचा-

या काळात अनेक नागरिकांनी हेस्कॉमकडे खंडित झालेल्या वीजपुरवठ्याबाबत खातरजमा न करता विचारपूसकेली.. अनेक जणांचे अधिकाऱ्यांशी फोनवर वादावादीचे प्रकार घडले.

नागरिकांनी समजून घेण्याची गरज…

विज गेल्यानंतर हेस्कॉमचे कर्मचारी तातडीने मोहिमेवर निघतात. याशिवाय असे काही प्राणी नुकसान करतात. त्यावेळी ते लवकर लक्षात येत नाही. त्यामुळे नागरिकांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे – हेस्कॉम अभियंता निपाणी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news