Nipani Silver Chariot: निपाणीत साकारला १५० किलो चांदीचा रथ

शेट्टी ज्वेलर्सच्या कारागिरांची कलाकुसर ; बदामीच्‍या बनशंकरीसाठी मेहनत
Nipani Silver Chariot: निपाणीत साकारला १५० किलो चांदीचा रथ
Published on
Updated on

निपाणी : बागलकोट जिल्ह्यातील बदामी येथील जागृत देवस्थान बनशंकरी देवी मंदिरासाठी निपाणीत १५० किलो चांदीचा भव्य रथ आणि १० किलो वजनाची आकर्षक चांदीची मूर्ती साकारण्यात आली आहे. निपाणीतील नामांकित सुवर्ण व्यावसायिक अपय्या शिवरुद्रप्पा शेट्टी ज्वेलर्स यांनी हे कलात्मक काम पूर्ण केले असून बुधवार दि. १७ रोजी मंदिरात या रथ व मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.

बनशंकरी देवी मंदिर समितीने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची जबाबदारी शेट्टी ज्वेलर्स यांच्याकडे सोपवली होती. मंदिर समितीने उपलब्ध करून दिलेल्या चांदीचा वापर करून अत्यंत देखणा, नक्षीदार आणि पारंपरिक शैलीतील रथ तयार करण्यात आला आहे. यासोबतच देवीची १० किलो वजनाची चांदीची मूर्तीही घडविण्यात आली आहे.

हा रथ आणि मूर्ती तयार करण्यासाठी तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लागला. एकूण २५ कुशल कारागिरांनी दररोज सुमारे दहा तास काम केले आहे. रथाचे काम पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात निपाणी समाधी मठाचे प्राणलिंग स्वामी यांनी कारागिरांच्या कौशल्याचे कौतुक केले.

यावेळी शेट्टी ज्वेलर्सचे सुरेश शेट्टी, रवींद्र शेट्टी, आदित्य शेट्टी, कार्तिक शेट्टी, डॉ. सी. बी. कुरबेट्टी, अमर बागेवाडी, महालिंगेश कोठीवाले, शिवानंद पुराणीकमठ, डॉ. एस. आर. पाटील, राजू वाळवे, प्रताप पट्टणशेट्टी, गीता पाटील, ललिता शेट्टी, सविता शेट्टी, रश्मी शेट्टी, यांच्यासह नागरिक व भक्तगण उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news