

खानापूर : सीमाप्रश्नासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिलेले हुतात्मे मराठी भाषिकांना प्रातःस्मरणीय आहेत. स्वाभिमान, निष्ठा आणि त्यागाच्या जोरावर सुरु असलेला हा लढा न्याय मिळेपर्यंत सुरु ठेवणे आमचे कर्तव्य आहे. सत्तेसाठी राष्ट्रीय पक्षात गेलेल्यांची तमा न बाळगता मातृभाषा आणि मातृसंस्कृतीसाठीचा संघर्ष अविरत सुरुच राहील, अशी ग्वाही माजी आमदार दिगंबर पाटील यांनी दिली.
स्टेशन रोडवरील हुतात्मा नागापा होसुरकर स्मारकस्थळी सीमालढ्यातील हुतात्म्यांना म. ए. समितीतर्फे शनिवारी (दि. 17) अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई म्हणाले, निवडणुका हरलो म्हणून आम्ही किंचितही मागे हटणार नाही. सत्ता आणि खुर्चीपेक्षा सीमा चळवळ महत्त्वाची आहे. सर्वोच्च न्यायालयातील लढा अधिक सक्षमपणे लढण्यासाठी लागणारा पाठपुरावा सुरू आहे. 21 जानेवारी रोजी होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत महाराष्ट्र सरकारने भक्कमपणे आपली बाजू मांडावी यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीच्या माध्यमातून प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
रणजीत पाटील म्हणाले, राष्ट्रीय पक्षांमध्ये गेलेल्यांना विसरुन निष्ठावंतांनी मिळून सीमालढ्याची पालखी पुढे नेण्याचे आवाहन केले. संभाजी देसाई म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी अनेक देशांतर्गत सीमावाद मिटविले आहेत. त्याच धर्तीवर कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्रावर दबाव निर्माण करणे आवश्यक असल्याचे सांगितले.युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी मरगळ झटकून तरुणांनी सीमा लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. सचिव आबासाहेब दळवी, माजी जि. पं. सदस्य विलास बेळगावकर, पुंडलिक कारलगेकर, जयराम देसाई, बाळासाहेब शेलार, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, विवेक गिरी, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, राजाराम देसाई, अरुण सरदेसाई, प्रकाश चव्हाण, मारुती परमेकर यांचीही भाषणे झाली.
सभेला अमृत शेलार, मऱ्यापा पाटील, मुकुंद पाटील, विजय गुरव, कृष्णा कुंभार, शंकर गावडा, पुंडलिक पाटील, वसंत नावलकर, यशवंत पाटील, मारुती गुरव, कृष्णा मन्नोळकर, विठ्ठल गुरव, रामचंद्र गावकर, संदेश कोडचवाडकर, बी. बी. पाटील, रवींद्र शिंदे, म्हात्रू धबाले, रुक्मान्ना झुंजवाडकर, डी. एम. गुरव, अनंत गुरव, विजयसिंह रजपूत, अनंत पाटील, राजू कुलम, डी. एम. भोसले, नाना घाडी, रमेश धाबाले, गोपाळ हेब्बाळकर, संतोष पाटील, अजित पाटील, सदानंद पाटील, प्रवीण सुळकर, विनायक चव्हाण, नागेश भोसले आदी उपस्थित होते.