

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
राज्यात परिवहन मंडळाच्या चार विभागातील कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून (दि. 15) संपावर जाण्याचा इशारा दिला होता. मात्र, राज्य सरकारने ‘एस्मा’ कायद्याचा बडगा उगारल्याने परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप लांबणीवर टाकला आहे. हा कायदा लागू झाल्यावर, कर्मचाऱ्यांनी संप करणे किंवा काम थांबवणे बेकायदेशीर ठरते
कर्नाटक परिवहन मंडळ कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये पगाराची थकबाकी, वेतनवाढ आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने वेतन या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. गेल्या ऑगस्टमध्येही कर्मचाऱ्यांनी संपाचा इशाला दिला होता. मुख्य मागणी 38 महिन्यांची थकबाकी आणि 25 टक्के वेतनवाढ ही होती. जानेवारी 2020 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीतील पगाराची थकबाकी प्रलंबित आहे.