

निपाणी : येथील महालक्ष्मी मंदिर वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कळसारोहण आणि त्रैवार्षिक यात्रेचे आयोजन दि. 3 फेब्रुवारी ते शनिवार दि. 7 फेब्रुवारीअखेर करण्यात आले आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती महालक्ष्मी देवस्थान आणि अभिवृद्धी संघाने दिली आहे.
मंगळवार दि. 3 रोजी सकाळी 11 वाजता महालक्ष्मी मूर्ती आगमन व सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. मंगळवारपासून रोज अखंड नामजप होणार आहे. बुधवार दि. 4 रोजी सकाळी 7.45 वाजता गणेश पूजन आणि होमहवन होईल. गुरुवार दि. 5 रोजी मंदिर वास्तुशांती आणि होम हवन कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार दि. 6 सकाळी नूतन मूर्ती प्राणप्रतीष्ठापना व कळसारोहण, दुपारी 4 नंतर त्रैवार्षिक यात्रेस प्रारंभ होऊन देवीची ओटी भरणे, नैवेद्य, आंबील कार्यक्रम होणार आहे. शनिवार दि. 7 रोजी सकाळी अभिषेक, पूजा ओटी भरणे कार्यक्रम होईल. रविवार दि. 8 रोजी सकाळी अभिषेक पूजा, दुपारी 12 वाजता महालक्ष्मीच्या पालखीची मिरवणूक निघणार आहे. सोमवार दि. 9 रोजी सकाळी अभिषेक, पूजा, देवी याग, होम हवन होणार आहे. होमहवन कार्यक्रमाला बसणाऱ्यांनी यात्रा कमिटीकडे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. मंगळवार दि. 10 रोजी सकाळी अभिषेक पूजा, संध्याकाळी 3 ते 5 या वेळेत कुंकूमार्चन, रात्री 7 ते 11 देवीच्या गोंधळाचा कार्यक्रम होणार असून बुधवार दि. 11 रोजी दुपारी 12 वाजता गांधी चौकात महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.