Belgaum Accident : महामार्गावर काम करताना मजुरांना टँकरने चिरडले, ३ मजूर जागीच ठार, अन्य गंभीर जखमी

बेळगाव जिल्ह्यातील इटगी क्रॉसवरील अपघात, सर्व मजूर गुलबर्गा जिल्ह्यातील असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात रोजंदारी मजूरीसाठी बेळगाव येथे आले होते.
Belgaum Accident
Belgaum Accident : महामार्गावर काम करताना मजुरांना टँकरने चिरडले, ३ मजूर जागीच ठार, अन्य गंभीर जखमी File Photo
Published on
Updated on

Laborers crushed by tanker while working on highway, 3 laborers killed on the spot

चिकोडी : काशिनाथ सुळकुडे

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मजूर काम करीत होते. यावेळी अचानक भरधाव वेगाने आलेल्‍या टँकरने ३ मजुरांना चिरडले. यामध्ये ३ मजूर जागीच ठार झाले तर अन्य गंभीर जखमी झाले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील इटगी क्रॉसवर हा भीषण अपघात घडला.

Belgaum Accident
Tej Pratap Yadav : "तुमचा आदेश देवापेक्षा मोठा..." : 'राजद'मधून हकालपट्टीनंतर लालू पुत्राची भावनिक पोस्‍ट

पुणे-बंगलुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर आज (रविवार) सकाळी मजूर काम करीत होते. यावेळी अचानक टँकर अंगावरून गेल्याने तीन जण ठार झाल्‍याची दुर्देवी घटना घडली. या भीषण अपघातात उर्वरित एक मजुराची स्थिती गंभीर तर काही महिला मजुर जखमी झाले आहेत.

Belgaum Accident
PSG vs Inter Milan | फुटबॉल सामन्‍यानंतर पॅरिसमध्‍ये उसळली दंगल; जमावाचा पोलिसांवर हल्‍ला, वाहनांची जाळपोळ

सर्व मजूर गुलबर्गा जिल्ह्यातील असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात रोजंदारी मजूरीसाठी बेळगाव येथे आले होते. या घटनेनंतर इतर मजुरांनी हंबरडा फोडला. कित्तूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत हा अपघात घडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news