

कारवार : यल्लापूर तालुक्यातील उमचगी येथील कर्नाटक विकास ग्रामीण बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला असून, आपले काम साध्य न झाल्याने चोरांनी आग लावून पळ काढल्याची घटना घडली आहे.
उमचगीमध्ये बुधवारी सकाळी बँकेच्या आतून धूर बाहेर येताना स्थानिकांनी पाहिले. त्यांनी त्वरित बँक मॅनेजर आणि कर्मचार्यांना बँकेच्या आतून धूर येत असल्याची माहिती दिली. तत्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांनाही फोन करून बोलावले. घटनास्थळी पोचलेल्या अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली.
बँकेच्या एका बाजूच्या खिडकीतील काच फुटलेली दिसली. चोरांनी खिडकी फोडून आत प्रवेश करून बँकेचे लॉकर्स फोडण्याचा प्रयत्न केला. पण ते शक्य न झाल्यामुळे बँकेचा सायरन वाजला. तेव्हा त्यांना आपले काम फत्ते होणार नाही हे लक्षात येताच त्यांनी कागदपत्रांना आग घातली. त्यानंतर ते पळून गेले. आग हळूहळू संगणक आणि काही कागदपत्रांपर्यंत पोहोचली.