कर्नाटक सेक्स स्कँडल : 50 पीडिता, 12 जणींवर बलात्कार; दाखल गुन्हे तीन

कर्नाटक सेक्स स्कँडल : 50 पीडिता, 12 जणींवर बलात्कार; दाखल गुन्हे तीन

बंगळूर, वृत्तसंस्था : कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी तसेच हासनचा जेडीएस खासदार प्रज्वल रेवण्णा याच्यासोबत व्हिडीओत दिसणार्‍या 50 जणींशी संपर्क साधण्यात यंत्रणांना यश आले आहे. यापैकी 12 जणींवर बळजबरी झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले असून, प्रत्यक्षात प्रज्वल याच्याविरोधात अद्याप केवळ 3 ठोस गुन्हे दाखल झालेले आहेत.

लैंगिक छळ झालेल्या पीडितांमध्ये 22 ते 61 वर्षे वयोगटातील महिलांचा समावेश आहे. समोर आलेल्या 50 पैकी जवळपास 12 महिलांना लैंगिक संबंध ठेवण्यासाठी असहाय करण्यात आले. हे सगळे गुन्हे बलात्कार या श्रेणीत समाविष्ट होतात. उर्वरित बहुतांश महिलांना आमिषे दाखविण्यात आलेली आहेत. व्हिडीओत प्रज्वलसोबत दिसणार्‍या महिलांपैकी प्रज्वलने कुणाला उपनिरीक्षक, तर कुणाला तहसीलदार म्हणून, तर कुणाला अन्य शासकीय विभागांत नोकरी मिळवून दिली. प्रकरणाच्या तपासासाठी कर्नाटक सरकारने 'एसआयटी' स्थापन केली आहे.

व्हिडीओत 2 प्रकारच्या महिला

काही महिलांना प्रज्वलने शरीरसंबंध ठेवण्यास बाध्य केले. स्वत: या प्रसंगाचा व्हिडीओ शूट करून या महिलांना पुन्हा तसे करायला भाग पाडले. काही महिलांनी स्वेच्छेने शारीरिक संबंध ठेवले आणि त्या बदल्यात प्रज्वलने त्यांना नोकरी मिळवून दिली किंवा मग भरपूर पैसा दिला.

प्रज्वलला 'शो कॉज' नोटीस

नवी दिल्ली : लैंगिक शोषणातील संशयित आरोपी प्रज्वल रेवण्णाला परराष्ट्र मंत्रालयाने शो कॉज नोटीस बजावली आहे. प्रज्वल याचे पारपत्र (पासपोर्ट) का रद्द करू नये, अशी विचारणा या नोटिसीद्वारे त्याला करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news