Karnataka Police Recruitment: पोलिस भरती परीक्षा वेळापत्रक जाहीर

सरकारच्या विविध खात्यांमधील ७० हजारांहून अधिक रिक्त पदांसाठी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांमध्ये भरती परीक्षा घेण्यात येणार
Karnataka Police Recruitment
Karnataka Police Recruitment
Published on
Updated on

बंगळूर : राज्य सरकारच्या विविध खात्यांमधील ७० हजारांहून अधिक रिक्त पदांसाठी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांमध्ये भरती परीक्षा घेण्यात येणार आहे. पैकी पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.

गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेंद्र कुमार कटारिया यांनी गुरुवारी परीक्षा पूर्णपणे पारदर्शक, निःपक्ष आणि भ्रष्टाचारमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. सिव्हिल पोलिस कॉन्स्टेबलच्या ३,९९१ पदांसाठी १२ ऑगस्टरोजी, आर्मड पोलिस कॉन्स्टेबलच्या १,६०० पदांसाठी ७ सप्टेंबर रोजी आणि स्पेशल पोलिस कॉन्स्टेबलच्या २,३१४ पदांसाठी २० सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्यात येतील. पहिल्या टप्प्यात एकूण ७,९०५ पोलिस कॉन्स्टेबल पदांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर ६२,००० हून अधिक इतर पदांसाठी परीक्षा घेण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.

खबरदारीची सूचना

कर्नाटक सार्वजनिक परीक्षा (भ्रष्टाचार आणि परीक्षेतील अनियमितता रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय) अधिनियम-२०२३ अंतर्गत परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गैरकारभार करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे कटारिया म्हणाले. पात्र उमेदवारांना न्याय देण्यासाठी परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने घेतली जाईल, ­असे त्यांनी सांगितले. बैठकीला डीजीपी उमेश कुमार, एडीजीपी हितेंद्र, महसूल आयुक्त मीना नागराज आणि कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक एच. प्रसन्ना उपस्थित होते.

परीक्षा कधी?

१२ ऑगस्ट : नागरी पोलिस कॉन्स्टेबलच्या ३,९९१ पदांसाठी

७ सप्टेंबर : सशस्त्र पोलिस कॉन्स्टेबलच्या १,६०० पदांसाठी

२० सप्टेंबर : विशेष पोलिस कॉन्स्टेबलच्या २,३१४ पदांसाठी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news