CM D.K. Shivakumar News | शेतकऱ्यांना दोन टप्प्यांत 5 हजार रुपये मदत; मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची घोषणा

CM D.K. Shivakumar News | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची मदत दोन टप्प्यांत मिळणार; मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार स्पष्टीकरण
D.K. Shivakumar News |
CM D.K. Shivakumar News |
Published on: 
Updated on: 

बंगळूर (पुढारी वृत्तसेवा):

राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने जाहीर केलेल्या ५ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीबाबत निर्माण झालेला संभ्रम मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दूर केला असून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दोन टप्प्यांत ५ हजार दिले जाणार असल्याचे म्हटले आहे.

D.K. Shivakumar News |
Kolhapur Shetkari Sanghatana Protest: पुणे-बंगळूर महामार्गावर शेतकऱ्यांचा चक्काजाम; कोल्हापूरहून पुण्याला जाणारी वाहतूक वळवली

भरपाईवरून राज्य सरकारने संभ्रम निर्माण केला असून शेतकऱ्यांना ५ हजार रुपये मदत देण्याचे आश्वासन देऊन आता काहींना २ हजार, तर काहींना १ हजार व ३ हजार रुपये दिले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता.

त्यावर मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमातून माहिती दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्पुरती मदत म्हणून ५ हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही रक्कम सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.

D.K. Shivakumar News |
Railway News : बंगळूर-मुंबई वंदे भारत स्लीपर १ नोव्हेंबरपासून?

सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम ही केवळ पहिल्या टप्प्यातील मदत असून जास्तीत जास्त २ हजार ५०० रुपयांपर्यंत मदत देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
दरम्यान पहिल्या टप्प्यात २ हजार रुपये मिळालेल्या शेतकऱ्यांना पुढील टप्प्यात उर्वरित ३ हजार रुपये दिले जाणार आहेत. तर २ हजार ५०० रुपये मिळालेल्या शेतकऱ्यांना पुढील टप्प्यात उर्वरित २ हजार ५०० रुपये दिले जातील. पावसावर अवलंबून असलेल्या पिकांसह सिंचनाखालील पिकांसाठी दुष्काळी मदत वाढविण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.