Karnataka education : पुस्तकांबरोबरच वह्याही मोफत

सरकारी, अनुदानित शाळांतील पटसंख्यावाढीसाठी प्रयत्न
Karnataka education scheme
पुस्तकांबरोबरच वह्याही मोफत
Published on
Updated on

बेळगाव ः राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या या शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. मात्र, पुढील शैक्षणिक वर्षांपासून पुस्तकांबरोबरच नोटबुकही (वह्या) मोफत देण्यात येणार आहेत. सरकारी व अनुदानित शाळांतील पटसंख्या वाढविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून शिक्षण खात्याने हा निर्णय घेतला आहे. सध्या या उपक्रमासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीची व्यवस्था केली जात आहे.

Karnataka education scheme
Schools News : नववी व दहावीच्या बहुतांश शाळा शिक्षकांविना

राज्यभरात 46,000 हून अधिक सरकारी आणि 7,500 सरकारी अनुदानित शाळा असून 50 लाखांहून अधिक मुले प्रवेश घेतात. सध्या शिक्षण खात्याकडून सरकारी शाळांतील मुलांना पाठ्यपुस्तके, बूट, मोजे, गणवेश आणि बॅग दिल्या जातात. तर अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. पण, आता त्यात वह्यांची भर पडणार आहे. विद्यार्थ्यांना आता फक्त शाळेत जाऊन अभ्यास करावा लागणार असून

बाकीची सर्व व्यवस्था सरकार करणार आहे. तथापि, ही योजना सुरु करण्यापूर्वी पालकांना भेटून त्यांच्या मुलांना सरकारी व अनुदानित शाळांमध्ये दाखल करण्याचे फायदे समजावून सांगण्याची सूचना करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील काही पालकांना त्यांच्या मुलांसाठी वह्या खरेदी करण्यात अडचण येत असल्याची माहिती शिक्षण खात्याला मिळाली होती. तसेच अनेक स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींकडूनही दरवर्षी सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले जाते. सध्या एका वहीची किंमत किमान 25 रुपयांपर्यंत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला वर्षाला किमान एक डझन वह्या लागतात. गरीब पालकांना वह्यांचा खर्च पेलवत नाही. हे लक्षात घेऊन, मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना वह्यासुद्धा मोफत देण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांनी दिली.

पदवीपूर्व विद्यार्थ्यांनाही लाभ

कर्नाटक पाठ्यपुस्तक सोसायटीकडून वह्यांचा पुरवठा केला जाणार आहे. तत्पूर्वी, सर्व शाळांना पटसंख्या आणि त्यानुसार नोटबुकची माहिती द्यावी लागणार आहे. याशिवाय सरकारी आणि अनुदानित महाविद्यालयांमधील प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही पुढील शैक्षणिक वर्षापासून मोफत पाठ्यपुस्तके व वह्या देण्यात येणार आहेत.

Karnataka education scheme
Disabled schools issue: एकोणीस शाळा मान्यता रद्दची शक्यता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news