

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="ASC" orderby="post_date" view="circles" /]
बंगळूर : पुढारी वृत्तुसेवा : उमेदवार यादीवरून भाजपमध्ये गोंधळ निर्माण झाल्यानंतर आता याद्यांमध्ये बदलाचे संकेत भाजपकडून मिळत आहेत. विशेषतः, वादग्रस्त मतदारसंघांतील उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. बेळगाव आणि कारवार मतदारसंघातील काही उमेदवार बदलण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा भाजप हायकमांड करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
भाजपची तिसरी यादी सध्या तयार असून लवकरच ती जाहीर केली जाणार आहे. त्यामध्ये उमेदवारीपासून वंचित असलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पहिली उमेदवारी यादी जाहिर होताच बेळगाव, धारवाड, शिवमोगा, कारवार, तुमकुर, हासन, म्हैसुर, बेंगळूर शहरासह अनेक ठिकाणी नाराजी व्यक्त झाली आहे. त्यामुळे हायकमांड तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, भाजपचे राज्य प्रभारी अरुण सिंग, प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांनी उमेदवारी हुकलेल्या भाजपा नेत्यांशी संपर्क साधून मनधरणी चालवली आहे. त्याचबरोबर त्यांना पुन्हा उमेदवारी देण्याबाबत चर्चा केली जात आहे. उमेदवारी जाहीर झालेल्यांनी पुढील आदेश येईपर्यंत आपला उमेदवारी अर्ज भरु नये. अशी सुचना पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.