Karnataka politics latest news | शिवकुमारांचे विश्वासू बाबू मुख्यमंत्री कार्यालयात

दोन्ही अधिकारी मुख्यमंत्री शिवकुमार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात
CM D. K. Shivakumar
CM D. K. Shivakumar
Published on
Updated on

बंगळूर : मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच डी. के. शिवकुमार यांनी आपल्या कार्यालयात (सीएमओ) विश्वासू सरकारी बाबूंची नियुक्ती केली आहे. सिद्धरामय्या सरकार काळात बंगळूर विकास मंत्री कार्यरत असताना आपल्यासोबत काम केलेल्या दोन आयएएस अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री कार्यालयात महत्त्वाच्या पदांवर नेमले आहे.

CM D. K. Shivakumar
Matheran Municipal Council : माथेरान न.प.ची सर्वसाधारण सभा ठरणार वादळी ?

बुधवारी (दि. ४) संध्याकाळी जारी केलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने आयएएस अधिकारी तुषार गिरीनाथ आणि राजेंद्र चोळण यांची अनुक्रमे अतिरिक्त मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. दोन्ही अधिकारी मुख्यमंत्री शिवकुमार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात.

CM D. K. Shivakumar
Gokul's politics | गोकुळ : महायुतीचा वाद मिटणार?

तुषार गिरीनाथ हे बंगळूर महापालिकेचे मुख्य आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यानंतर नगर विकास विभागाचे (यूडीडी) अतिरिक्त प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. कार्यकाळात गिरीनाथ यांनी बंगळूर-केंद्रित अनेक प्रकल्पांनाही मंजुरी दिली. राजेंद्र चोळण यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचा अनेक धोरणात्मक आणि प्रशासकीय बाबींचा समन्वय साधला होता. त्यामुळे, ते दोघेही शिवकुमार यांच्या खाज मर्जीतील मंत्री म्हणून ओळखले जातात.

CM D. K. Shivakumar
Jalgaon politics |...तर बडबड्या नेत्यांनी आधी आपली लोकं सांभाळावी; महाजनांचा राऊतांना टोला

सरकारने गिरीनाथ यांना नगरविकास विभागाचा कार्यभार सांभाळण्यासही परवानगी दिली आहे. चोळण यांच्याकडे कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (केपीसीएल) च्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news