Belgaon accident: नवरात्रोत्सवाच्या आनंदात दुःखाचा डोंगर; दुर्गामाता दौड मिरवणुकीत ट्रक घुसला; ३ ठार, १० हून अधिक जखमी

बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती आणि हत्तरगी टोल नाक्याजवळ 'दुर्गामाता दौड' मिरवणुकीत ट्रक घुसल्याने तिघांचा मृत्यू झाला.
Belgaon accident Durgamata Daud Devi procession
Belgaon accident Durgamata Daud Devi processionFile Photo
Published on: 
Updated on: 

Belgaon accident Durgamata Daud Devi procession

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती आणि हत्तरगी टोल नाक्याजवळ 'दुर्गामाता दौड' मिरवणुकीत ट्रक घुसल्याने तिघांचा मृत्यू झाला, तर १० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

हुंच्यानट्टी गावातील भाविक बेळगाव येथून दुर्गामातेची मूर्ती घेऊन हुंच्यानट्टी गावाकडे वाजतगाजत मिरवणुकीने परतत होते. यादरम्यान, पाठीमागून आलेल्या एका ट्रकने मिरवणुकीला धडक दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

Belgaon accident Durgamata Daud Devi procession
Kasara Ghat Accident | वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; कसारा घाटात कंटेनरखाली दबून दाम्पत्याचा मृत्यू

प्रकाश, महेश आणि ज्ञानेश्वर अशी अपघातात मृत्यू झालेल्या भाविकांची नावे आहेत. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात तसेच नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमी झालेल्या इतर व्यक्तींची नावे आणि सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. सदर घटनेची नोंद यमकनमरडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे. नत्ररात्रीच्या उत्साहात घडलेल्या या दुर्घटनेमुळे हुंच्यानट्टी व परिसरात शोककळा पसरली आहे.

Belgaon accident Durgamata Daud Devi procession
Sangli Accident : हिंगणगावजवळ दोन दुचाकींच्या धडकेत निवृत्त शिक्षकाचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news