कर्नाटक विधानसभा रणधुमाळी : लक्ष्मण सवदींना अथणीची उमेदवारी

कर्नाटक विधानसभा रणधुमाळी : लक्ष्मण सवदींना अथणीची उमेदवारी

बेळगाव, बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  भाजपची आमदारकी आणि प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा देऊन शुक्रवारी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या लक्ष्मण सवदींना दुसर्‍याच दिवशी म्हणजे शनिवारी काँग्रेसने अथणीची उमेदवारी जाहीर केली. त्याचबरोबर बेळगाव उत्तरमधून राजू सेठ, बेळगाव दक्षिणमधून प्रभावती मास्तमर्डी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने 43 उमेदवाराची तिसरी यादी शनिवारी सकाळी जाहीर करताना रायबागमधून ज्येष्ठ नेते महावीर मोहिते यांना रिंगणात उतरवले आहे.

काँग्रेसने 25 मार्चरोजी 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर 7 मार्च रोजी 42 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती. शनिवारी तिसरी यादी जाहीर करताना बेळगावातील उर्वरित पाचही मतदारसंघांचे उमेदवारी जाहीर करण्यात आल्या. त्यामुळे काँग्रेसचे आता बेळगाव जिल्ह्यातील सर्व 18 उमेदवार निश्चित झाले आहेत. तिसर्‍या यादीसह काँग्रेसचे एकूण 207 उमेदवार निश्चित झाले आहेत. आणखी 17 उमेदवार निश्चित व्हायचे आहेत.

माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या शिकारीपूर मतदारसंघातून यंदा त्यांचे पुत्र विजयेंद्र लढत आहेत. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसने जी. बी. मालतेश यांना रिंगणात उतरवले आहे. तर बहुचर्चित कोलार मतदारसंघातून के. जी. मंजूनाथ लढतील. कुमठा मतदारसंघातून निवेदित अल्वांना उमेदवारी देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news