Kalaburagi BCM Hostel Party | मद्य पार्टी: मुलांची नव्हे, चक्क मुलींची, तीही वसतिगृहात! व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

कडगंची (ता. आळंद) येथील बीसीएम महिला वसतिगृहातील प्रकाराची चौकशी करण्याची पालकांची मागणी
 Kadaganchi Girls Hostel Liquor Controversy
Kadaganchi Girls Hostel Liquor ControversyAI
Published on
Updated on

Kadaganchi Girls Hostel Liquor Controversy

कलबुर्गी : कडगंची ( जि. कलबुर्गी ता. आळंद) येथील बीसीएम महिला वसतिगृहात विद्यार्थिनींनी चक्क मद्यपार्टी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मद्य पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळासह पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या व्हिडिओमध्ये काही विद्यार्थिंनी वसतिगृहाच्या खोलीत बसून मद्यप्राशन करत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित व्हिडिओ विद्यार्थिनींनीच चित्रीत केल्याची चर्चा सुरू आहे. सदर . व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

 Kadaganchi Girls Hostel Liquor Controversy
Daund Kalaburagi special train: होळीसाठी दौंड-कलबुर्गी विशेष गाड्या धावणार

या घटनेमुळे वसतिगृहातील सुरक्षा व शिस्तीवर प्रश्नचिन्ह पालकांनी उपस्थित केला आहे. राज्यातील विविध भागांसह इतर राज्यांतूनही अनेक विद्यार्थिनी येथे शिक्षणाच्या निमित्याने वास्तव्य करून आहेत. मात्र, या प्रकारामुळे पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, येथील वसतिगृहात मद्य कसे पोहोचले ? सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी होत्या का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे याबाबत चौकशी करण्याची मागणी होत आहे. तर काहींनी वसतिगृहाच्या सुरक्षा रक्षकाचीही चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी, पालक व नागरिकांकडून करण्यात येत आहे. अधिकृत चौकशी अहवालानंतरच या प्रकरणाचे संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news