Gold Scam | सराफाला तब्बल दीड कोटीचा चुना

१.३७५ किलो सोन्याचे दागिने, २४ लाख गमावले
Gold Scam |
Gold Scam | सराफाला तब्बल दीड कोटीचा चुनाPudhari File Photo
Published on
Updated on

धारवाड : मातीत सोने असल्याचे सांगून एका सराफाची तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना हुबळीतील दुर्गदबैल परिसरात उघडकीस आली आहे. सोन्याच्या आमिषाला भुललेल्या सराफाने संशयितांना लाखो रुपयांचे सोने आणि रोख रक्कम दिली. मात्र, नंतर दिलेल्या मातीत सोनेच नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

मंटुकुमार डोलुय असे फसवणूक झालेल्या सराफाचे नाव असून त्यांचे दुर्गदाबैलमध्ये ओम डायमंड ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. हरियाणा येथील मुकेश नावाच्या व्यक्तीची मंटुकुमार यांच्याशी पूर्वीपासून ओळख होती. काही दिवसांपूर्वी मुकेश अन्य व्यक्तींसह त्यांच्या दुकानात आला. त्याने राखमिश्रित माती दाखवत त्यात सोने असल्याचा दावा केला. व्यापाऱ्याचा विश्वास बसावा यासाठी सुरुवातीला थोड्या मातीतून सोने काढून दाखवले.

तपासणीनंतर हे सोने खरे असल्याचेही स्पष्ट झाले. मुकेशने आपल्याकडे अशी माती मोठ्या प्रमाणावर असून त्यातून खूप सोने मिळू शकते, असा दावा केला. मंटुकुमार यांनी सुमारे १ किलो ३७५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २४.५ लाख रुपये त्याच्या हवाली केले. मुकेश व अन्य संशयित निघून गेल्यानंतर मंटुकुमार यांनी उर्वरित माती तपासली असता त्यात सोन्याचा कणही आढळला नाही. त्यानंतर मुकेशशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल बंद असल्याचे समोर आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news