

बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मृत संघातर्फे (इस्कॉन) टिळकवाडी, शुक्रवार पेठ येथील राधा गोकुळानंद मंदिरात विविध कार्यक्रम, शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. 9) भगवान बलराम यांच्या प्रकटदिनानिमित्त सायं. 6 वा. कीर्तन, 6.30 वा अभिषेक, 7 वा. भक्ती रसामृत स्वामी महाराजांचे प्रवचन आणि रात्री 8.40 वा. महाआरती व प्रसाद वाटप होईल. शनिवारी (दि. 16) कृष्ण जन्माष्टमी साजरी होईल. रात्री 9 वा. श्रीकृष्ण जन्मावर नाट्य, रात्री 10. 45 वा. विशेष कृष्णकथा, मध्यरात्री 12 वा. महाआरती व प्रसाद वाटप होईल. दि. 17 रोजी इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभूपाद यांचा जन्मदिन साजरा होणार आहे. दुपारी महाप्रसाद वाटप होईल.
सोमवार दि. 4 ते दि. 10 पर्यंत शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धां होणार आहेत. सोमवारी (दि. 4) श्रीकृष्णाच्या जीवनावर कथाकथन स्पर्धा, मंगळवारी (दि. 5) भगवद गीता श्लोक पठण स्पर्धा, बुधवारी (दि. 6) भक्तिगीत गायन स्पर्धा, गुरुवारी (दि. 7) रोजी प्रश्नमंजुषा रविवारी (दि. 10) रांगोळी व फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार आहेत. पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आणि आठवी ते दहावी या तीन गटात स्पर्धा होत असून विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेद्वारे नावे नोंदवावीत, असे आवाहन इस्कॉनतर्फे करण्यात आले आहे.