Hukkeri news: सभेतून सीडीपीओ कर्मचाऱ्याला काढले बाहेर

तहसीलदारांकडून कारवाईची सूचना
Hukkeri news
Hukkeri news: सभेतून सीडीपीओ कर्मचाऱ्याला काढले बाहेरPudhari
Published on
Updated on

हुक्केरी : डॉ. बाबू जगजीवनराम व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित पूर्वतयारी बैठकीत काही तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. बैठकीत तहसीलदारांच्या सूचनेनुसार अधिकाऱ्यांव्यतिरिक्त उपस्थित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना सभेतून बाहेर काढण्यात आले.

बैठकीत दलित प्रमुखांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर आक्षेप घेत त्यांच्याऐवजी उपस्थित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना सभेतून बाहेर जाण्याची मागणी केली. यावर तहसीलदार बलराम कट्टीमनी यांनी गैरहजर अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे स्पष्ट केले.

संबंधित अधिकाऱ्यांव्यतिरिक्त उपस्थित असलेल्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना सभेतून बाहेर जाण्याचे आदेश देण्यात आला. त्यानुसार महिला व बालकल्याण विभागाच्या (सीडीपीओ कार्यालयाशी संबंधित) कर्मचाऱ्याला सभागृहाबाहेर पाठविण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. यावेळी अधिकारी, मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news