

बेळगाव : गांजा पन्नीबरोबरच शहरात काही ठिकाणी हेरॉईनही मिळत असल्याचे आढळून आले आहे. माळमारुती पोलिसांनी शिवबसवनगरमध्ये 30 हजार रुपये किंमतीचे 16 ग्रॅम हेराईन जप्त करत एकाला अटक केली. कार्तिक सिद्धाप्पा मल्लाडद (वय 25, रा. शिवाजीनगर, बेळगाव) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, कार्तिक शिवबसवनगरमधील पीडब्ल्यूडी क्वॉर्टर्सजवळ अमली पदार्थ विकत असल्याची माहिती माळमारुती ठाण्याचे निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांना मिळाली. त्यांनी सहकार्यांसह जाऊन छापा टाकला असता तो 16 ग्रॅम हेराईनसह सापडला. याची किंमत 30 हजार रुपये होते.
याव्यतिरिक्त त्याच्याकडून 520 रुपयांची रोख रक्कम, आयफोन असा 90 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. अमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत त्याच्यावर माळमारुती ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.