

बेळगाव : गोवावेस वाहतूक सिग्नलजवळ असलेल्या पोलिस चौकीसमोरच पादचारी महिलेला कँटरने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. शिबा वासिम इनामदार (वय 32, रा. बाबले गल्ली, अनगोळ) असे मृत महिलेचे नाव आहे.
आपल्या दोन मुलांना शाळेतून घरी घेऊन जाण्यासाठी त्या आल्या असताना हा अपघात घडला. कँटर आरपीडी क्रॉसवरून गोगटे सर्कलकडे निघाला होता. शिबा आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी शिबा गोवावेसकडे आल्या होत्या. त्यांना कँटरने मागच्या बाजूने धडक दिली. त्यामुळे त्या खाली कोसळल्या. त्यांना जवळच असलेल्या खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
शिबा यांना गंभीर दुखापत झाली नाही. मात्र घाबरून हृदयघाताने मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. शल्यचिकित्सेनंतर मृत्यूचे कारण कळू शकणार आहे. घटनेनंतर दक्षिण रहदारी पोलिसांनी कँटर ताब्यात घेतला असून चालकावर गुन्हा दाखल केला आहे.