

बेळगाव : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या नावे पुन्हा बनावट फेसबुक अकाउंट उघडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आला आहे. त्यानंतर तातडीने प्रशासनाकडून त्या अकाउंटला कोणीही बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर सायबर क्राईम विभागाकडे तातडीने तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेची फसवणूक करण्यासाठी भामटे वेगवेगळे मार्ग अवलंबले जात आहे. त्याला अनेक जण फशी पडत आहेत. यामधीलच एक प्रकार म्हणजे विविध महनीय व्यक्तीच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट काढून त्या माध्यमातून संपर्क साधणे ,त्यानंतर रक्कम किंवा इतर वस्तूंची मागणी केली जात आहे.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या नावे यापूर्वीही अकाउंट उघडण्यात आले होते. दुसर्यांदा हा प्रकार घडल्याने सायबर क्राईम विभागाने याची गांभीर्याने दखल घेतली असून संबंधितांचा शोध सुरू केला आहे. फेसबुक अकाउंट ओपन करताना जिल्हाधिकार्यांचा मोबाईल क्रमांक तसेच छायाचित्रही अपलोड करण्यात आले आहे. अकाउंटच्या माध्यमातून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्यात आली आहे. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.