BSF recruitment case: बनावट प्रमाणपत्रांमुळे जवानांच्या नोकरीवर गंडांतर

बीएसएफ भरती प्रकरण : जवानांना पुन्हा सेवेत घेण्याची मागणी
BSF recruitment case: बनावट प्रमाणपत्रांमुळे जवानांच्या नोकरीवर गंडांतर
Published on
Updated on

बेळगाव : दोन वर्षापूर्वी बीएसएफमध्‍ये (बॉर्डर सिक्युरिटी फोर्स) भरती झालेल्या जवानांचे एन. एस. क्यू. एफ. प्रमाणपत्र बनावट असल्याच्या कारणावरुन त्यांना सेवेतून कमी करण्यात आले आहे. देशभरातील ८०० युवक बेरोजगार झाले आहेत. त्यांना पुन्हा सेवेत सामावून घ्यावे. अशी मागणी एन. एस. टी. पी. ए. असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गिरीराज शिर्गे यांनी बुधवारी (दि.६) कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश येथून आलेल्या जवानांनी आपल्या व्यथा मांडल्‍या. २०२३ पर्यंत बीएसएफ भरतीत एन. एस. क्यू. एफ. प्रमाणपत्राची मागणी होत नव्हती. आता ती करण्यात आली आहे. आम्‍ही सादर केलेले प्रमाणपत्र दोन वर्षानंतर बनावट असल्याची बाब समोर आली आहे. अचानक सेवेतून डच्चू दिल्याने आमच्‍यावर संकट कोसळले आहे. त्‍यामुळे आम्हाला पुन्हा सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी त्‍यांनी केली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news