Child Safety During Holidays | सुट्टीचा आनंद घ्या, पण जपून!

दसरा सुट्टीत मुलांची काळजी आवश्यक : संगीत, कला, खेळांमध्ये गुंतवावे
Child Safety During Holidays
Child Safety During Holidays | सुट्टीचा आनंद घ्या, पण जपून!(Pudhari file Photo)
Published on
Updated on

बेळगाव : जिल्ह्यातील सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित शाळांना शनिवार, दि. 20 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत दसरा सुटी देण्यात आली आहे. सुटीत मुले विविध ठिकाणी फिरायला जाणार्‍याबरोबर पोहायला जात असतात. त्यामुळे पालकांनी मुलांची काळजी घेण्याची गरज आहे. पालकांनी सुटीत आपल्या पाल्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात गुंतवून ठेवणे गरजेचे आहे.

यापूर्वी सुटीच्या काळात गंभीर घटना घडल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे पालकांनी पाल्यांना संगीत, कला, क्रीडा यासारख्या त्यांच्या आवडीच्या विषयात गुंतवण्यावर अधिक भर द्यावा. नोकरीअथवा इतर कामानिमित्त बाहेर गेलेल्या पालकांना आपल्या पाल्यावर लक्ष ठेवण्यासाठी वेळ नसतो. अशा पालकांनी आपल्या पाल्यांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

Child Safety During Holidays
Belgaum Crime News | ‘त्या’ बालिकेच्या अज्ञात पालकांविरोधात गुन्हा

सुट्टीच्या कालावधीत मुले पोहण्यासाठी नाले, तलाव व विहीर आदी ठिकाणी जात असतात. या ठिकाणी खबरदारी घेतली जात नसल्याने दुर्घटना घडण्याचा धोका असतो. तसेच या काळात विद्यार्थी दिवसभर मोबाईलमध्ये मग्न असतात. याचेही गंभीर परिणाम मुलांवर होत असतात. त्यासाठी पालकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. सुट्टीत मुलांना इकडे-तिकडे न पाठविता कला, नृत्य, संगीत, खेळ यामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. सुटीच्या काळात मुले मित्रांबरोबर भटकंती करत असतात. त्यामुळे मुले बेपत्ता होण्याच्या घटना घडल्या आहेत.

शाळांना सुटी असल्याने अनेकांनी आधीच सुटीचे नियोजन केलेले असते. अनेकजण पर्यटन स्थळी जाता. पर्यटनस्थळी जाताना खबरदारी घ्यावी. धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, फिरायला गेल्यानंतर अनेकज सेल्फी घेत असतात. सेल्फी घेताना काळजी घेण्याची गरज आहे. सेल्फीमुळे अनेकांनी आपला जीव गमविल्याची उदारहणे आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांसोबत असणे आवश्यक आहे.

Child Safety During Holidays
Belgaum Rain News | शहर-तालुक्यात गडगडाटासह पाऊस

पालकांनी मुलांना सुटीत त्यांच्या आवडीच्या विषयात गुंतवून ठेवावे. फिरायला गेल्यावर मुलांना पाण्यापासून दूर ठेवावे. मुलांची सुरक्षा महत्त्वाची आहे. सेल्फी घेताना काळजी घ्यावी. निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडण्याचा धोका अधिक असतो.

बाळासाहेब पसारे पालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news