

बेळगाव : आरोग्य, शिक्षण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे केएलई संस्थेचे मानद कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांना मंगळवारी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कारामुळे बेळगावच्या लौकिकात भर पडली आहे.
राष्ट्रपती भवनात पद्मश्री पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. कोरे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधानासह मान्यवरांना अभिवादन करून राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.
सोहळ्याला डॉ. कोरे यांच्या पत्नी आशा कोरे, पुत्र तथा केएलईचे कार्याध्यक्ष अमित कोरे, मुलगी संचालिका डॉ. प्रीती कोरे-दोडवाड आणि दीप्ती कोरे यांची उपस्थिती होती. डॉ. कोरे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविल्यामुळे बेळगावच्या इतिहासात मानाचे पान जोडले गेले.
आनंदोत्सव
डॉ. प्रभाकर कोरे यांनी केएलई संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, सहकार, समाजकारण आदी क्षेत्रांत प्रभावी कामगिरी बजावली आहे. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर सोशल मीडियावर अभिनंदनाचे संदेश व्हायरल झाले.