Dr. Prabhakar Kore: डॉ. कोरे शरण साहित्‍य पुरस्‍काराने सन्‍मानित

बंगळूर येथील शरण साहित्य संमेलनात गौरव
Dr. Prabhakar Kore: डॉ. कोरे शरण साहित्‍य पुरस्‍काराने सन्‍मानित
Published on
Updated on

अंकली : केएलई संस्थेच्या माध्यमातून आशिया खंडात आरोग्य, शिक्षण व समाजसेवा या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून नुकताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार स्वीकारलेले डॉ. प्रभाकर कोरे यांचा शरण साहित्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. बंगळूर येथे पार पडलेल्या १४ व्या अखिल भारतीय शरण साहित्य संमेलनात डॉ. कोरे यांना पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले.

पुरस्कार वितरण समारंभाला माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, बाल्की मठाचे परमपूज्य बसवलिंग पट्टदेवरू महास्वामी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, परिषदेचे अध्यक्ष जी. आर. चन्नबसप्पा, साहित्यिक एस. षडाक्षरी तसेच डॉ. सी. सोमशेखर यांच्‍यासह मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर

डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले, अखिल भारतीय शरण साहित्य संमेलनाचा हा सन्मान स्वीकारताना मला अत्यंत आनंद होत आहे. शरण मूल्ये, समाजसेवा, शिक्षण आणि लोकसेवा या मार्गावर अधिक समर्पितपणे कार्य करण्याची प्रेरणा या पुरस्कारातून मिळाली आहे. हा बहुमान प्रदान केल्याबद्दल शरण साहित्य परिषदेचे आयोजक, सर्व मान्यवर आणि उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news