Nipani Accident | रस्त्यावर टाकलेल्या खडीने घेतला दत्तवाडच्या कामगार तरुणाचा बळी

कसनाळ-बोरगाव मार्गावर दुचाकी घसरून अपघात : रस्ते बांधकाम कंत्राटदारासह दुचाकीस्वारावर गुन्हा
Dattwad youth death
बाळासो महादेव मुदाळेPudhari
Published on
Updated on

Sadalg-Kasnal road accident

निपाणी : रस्ता करण्यासाठी टाकलेल्या खडीमुळे दुचाकीवरून पडून कामगार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. बाळासो महादेव मुदाळे (वय ३०, रा.जैन बस्तीजवळ, दत्तवाड ता.शिरोळ) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा अपघात कसनाळ-बोरगाव मार्गावर सोमवारी रात्री झाला. याबाबत सदलगा पोलिसांत स्थानकात मयत दुचाकीस्वारासह रस्ते बांधकाम कंत्राटदार या दोघांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, मयत दुचाकीस्वार बाळासो मुदाळे हा गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथे एका कंपनीत कामावर होता.सोमवारी रात्री ११च्या सुमारास तो कामावरून दुचाकीवरून घरी परतत होता.दरम्यान कसनाळ-बोरगाव रस्त्यांचे बांधकाम सुरू असल्याने कंत्राटदार सदाशिव बेनाळी यांनी माळगे यांच्या शेताजवळ या मार्गावर डांबरीकरणासाठी खडीचा ढीग टाकला होता.दरम्यान दुचाकीस्वार बाळासो मुदाळे यांना तो न दिसल्याने त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्यामुळे मुदाळे हा दुचाकीवरून खाली कोसळल्याने ठार झाला.दरम्यान हा अपघात बराच उशिरानी रात्री गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला दिसून आला.

Dattwad youth death
Nipani Accident | निपाणीजवळ अज्ञात वाहनाला दुचाकीची धडक: अर्जुनीचा तरुण ठार; एकजण गंभीर जखमी

त्यानुसार मयत युवकाची ओळख पटवीत याची माहिती बाळासो मुदाळे यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. त्यानुसार घटनास्थळी चिकोडीचे सीपीआय विश्वनाथ चौगुला, सदलगा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक मल्लिकार्जुन बिरादार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.याबाबत मयत बाळासो यांचे वडील महादेव निंगापा मुदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदलगा पोलिसांनी कंत्राटदार बेनाळी व दुचाकीस्वार मयत बाळासो मुदाळे या दोघा विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनिरीक्षक मल्लिकार्जुन बिरादार यांनी चालवला आहे.मयत बाळासो याच्या पश्चात आई, वडील,पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news