Nipani Accident | निपाणीजवळ अज्ञात वाहनाला दुचाकीची धडक: अर्जुनीचा तरुण ठार; एकजण गंभीर जखमी

मुरगूड रोडवर अपघात
Arjuni Youth Death Nipani Road Accident
प्रकाश मिसाळ Pudhari
Published on
Updated on

Arjuni Youth Death Nipani Road Accident

निपाणी: पुढे निघालेल्या अज्ञात वाहनाला मागून दुचाकीची धडक बसून झालेला अपघातात दुचाकीस्वार युवक शेतकरी प्रकाश सदाशिव मिसाळ (वय २६, रा.अर्जुनी ता.कागल) हा जागीच ठार झाला. तर दुचाकीवर मागे बसलेला त्याचा मित्र ओंकार बाळासाहेब चौगुले (वय २५) हा गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी (दि.१) रात्री झाला. घटनेची नोंद शहर पोलिसात झाली आहे.

मृत प्रकाश मिसाळ व त्याचा मित्र ओंकार चौगुले हे दोघेजण निपाणी येथून आपले काम आटोपुन मूळगावी दुचाकीवरून जात होते. दरम्यान त्यांची दुचाकी निपाणी-मुरगुड रोडवर देवचंद कॉलेजवळ आली असता पुढे निघालेल्या अज्ञात वाहनाला दुचाकीस्वार प्रकाश मिसाळ याचा वाहनावरील ताबा सुटल्याने मागून जोराची धडक बसली. यामध्ये दोघेही खाली कोसळल्याने प्रकाश मिसाळ हा जागीच ठार झाला. तर जखमी ओंकार चौगुले याला तातडीने निपाणी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Arjuni Youth Death Nipani Road Accident
Nipani Accident | तवंदी घाटात काचवाहतूक ट्रक पलटी १० लाखाचे नुकसान ; चालक गंभीर

दरम्यान अपघाताची माहिती घटनास्थळी उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ, हवालदार बसवराज नेर्ली यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून रितसर पंचनामा करून मयत युवकाची ओळख पटवून सीसीटीव्ही फुटेजच्या अज्ञात वाहनाचा शोध घेतला.याबाबत मयत प्रकाश मिसाळ याचा भाऊ आकाश सदाशिव मिसाळ यांनी रितसर फिर्याद दिली आहे.मयत प्रकाश मिसाळ हा शेती करीत होता.त्याच्या पश्चात आई,भाऊ,विवाहित बहीण असा परिवार आहे. मृत प्रकाश मनमिळावु व हळव्या स्वभावाचा होता. अपघातात त्याचा अकाली मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news