

बेळगाव : अठरा वर्षे पूर्ण होण्याआधीच मुलीचे लग्ग लावण्याचे प्रकार आजही समाजात सुरु आहेत. परंतु, ते रोखण्यासाठी आता अक्का पथक सक्रिय झाले आहे. आतापर्यंत या पथकाने शहरातील चार बालविवाह रोखले आहेत. त्यामुळे, तुम्ही तुमच्या मुलीचा बालविवाह करत असाल तर सावधान राहा. मुलीच्या कुटुंबाला दोन लाखांचा दंड होऊ शकतो, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. बालविवाहामुळे मुलीला भविष्यात अनेक त्रास सहन करावे लागतात. त्यामुळे, सरकारने मुलीचे विवाहाचे वय १८ तर मुलाचे २१ वर्षे केले आहे. तरीही काही पालक आपल्या मुलीचे लग्र १५-१६ वर्षातच करत असल्याचे प्रकार आढळून येत आहेत.
दोन दिवसांपूर्वी शास्त्रीनगरमध्ये रोखलेल्या विवाहात तर मुलीचे वय अवघे १३ वर्षे आढळून आले आहे. गेल्या आठवडचात वंटमुरी कॉलनीत लग्नाचा घाट घातलेली युवती १७ वर्षाची होती. याशिवायही दोन प्रकरणे उघडकीस आली असून त्यामध्येही मुलींचे वय कमी असल्याचे दिसून आले आहे.
गेल्या महिनाभरापासून शहर परिसरातील क्का पथक अधिक सक्रिय झाले आहे. गस्तीवर असताना लग्नाचा मंडप दिसला, लोक जमलेले दिसले की तेथे अवका पथक थांबून चौकशी करत आहे. मुलीची कागदपत्रे मागवून शहानिशा करत आहेत. बालविवाह होत असेल तर ही माहिती महिला व बालविकास खात्याला अज्ञात व्यक्तींकडून १०९८ या क्रमांकावर फोन करुन माहिती दिली जात आहे. याशिवाय अनेकदा ११२ क्रमांकावर असे फोन येत आहेत. या आधारे पोलिसांकडून पुढील कारवाई केली जात आहे.
एखादा बालविवाह उघडकीस आला तर संबंधित मुलीच्या वडिलांवर पोलिसांत गुन्हा दाखल करुन घेतला जात आहे. हा गुन्हा म्हणजे थेट एफआयआर नसला तरी तो प्रतिबंधात्मक पद्धतीचा बॉन्ड घेतला जातो. आपली मुलगी लग्राच्या वयाची होईपर्यंत अर्थात १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तिचे लग्न करणार नाही, असे काही केले तर दोन लाखांचा दंड करण्यास
बालविवाहा-संबंधी कसलीही माहिती आपल्याकडे आल्यास आक्का पथकामार्फत शहानिशा केली जाते. बालविवाह करणे हा कायद्यानुसार किती मोठा गुन्हा आहे, शिवाय याचे तोटे कसे आहेत, हे कुटुंबाला समजावून सांगितले जाते. त्यामुळे, पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलीचा विवाह करू नये.
- दिलीप निंबाळकर, निरीक्षक, महिला पोलिस ठाणे