Bike Hits Container | दुचाकीची कंटेनरला धडक; बालक ठार

मायलेक गंभीर : तवंदी घाटात खड्डा चुकविताना अपघात
Bike Hits Container
निपाणी : अपघातग्रस्त कंटेनर व दुचाकी. (Pudhari File Photo)
Published on
Updated on

निपाणी : खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकीची कंटेरला धडक बसून अपघातात दुचाकीवरील बालक ठार झाले तर मायलेक गंभीर जखमी झाले. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटता हॉटेल अमरसमोर गुरुवारी (दि. 24) सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.

अवनीश ऋषिकेश तेली (वय 3) असे मृत बालकाचे नाव आहे. महानंदा आनंदा तेली (वय 60) व दुचाकीस्वार ऋषिकेश आनंदा तेली (वय 33, सर्व रा. हनिमनाळ ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर निपाणी व कोल्हापूरमध्ये उपचार सुरु आहेत.

Bike Hits Container
Nipani Municipal Council | निपाणी पालिकेचा कारभार चव्हाट्यावर

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, दुचाकीस्वार ऋषिकेश आई महानंदा व मुलगा अवनीश यांना कोल्हापूरला देवदर्शनासह नातेवाईकांना भेटण्यासाठी गेला होता. तेथून परतताना दुचाकी तवंदी घाटात हॉटेल अमरसमोर आली असता रस्त्यातील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्न ऋषिकेशने केला. याचवेळी मागून कोल्हापूरहून बेळगावच्या दिशेने जाणार्‍या कंटेनरला दुचाकीची धडक बसल्याने तिघेही कोसळले. अवनीशचा मृत्यू झाला. तर दोघा जखमींना तातडीने उपचारासाठी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Bike Hits Container
Nipani Accident| मित्राच्या हळदी समारंभाहून परतताना तरूणावर काळाचा घाला; दुचाकी झाडावर आदळून अपघाती मृत्यू

गंभीर जखमी महानंदा यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरमधील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. तर ऋषिकेश याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताची माहिती मिळताच अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक संतराम माळगे यांनी याची माहिती शहर पोलिसांना दिली. पोलिस उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ यांच्यासह हवालदार पी. एम. घस्ती यांनी पंचनामा केला. रात्री उशिरा कंटेनरचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास उपनिरीक्षक कार्जोळ करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news