Satej Patil : दुष्काळाच्या संकटातून शेतकरी बाहेर पडो

आ. सतेज पाटील यांचे तोरणहळीतील हनुमानाला साकडे
Satej Patil : दुष्काळाच्या संकटातून शेतकरी बाहेर पडो
Published on: 
Updated on: 

चिकोडी : महाराष्ट्र व कर्नाटकात दुष्काळजन्‍य परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याला ताकद मिळो, दुष्काळाच्या संकटातून शेतकरी बाहेर पडो, असे साकडे माजी मंत्री व आमदार सतेज पाटील यांनी तोरणहळीतील हनुमानाच्‍या चरणी घातले.

तोरणहळी गावातील जागृत देवस्‍थान हनुमान मंदिराला भेट देत दर्शन घेतल्‍यानंतर ते बोलत होते. दोन्ही राज्यांमधील शेतकरी बांधवांना सुख व समृद्धी मिळो अशी प्रार्थना केली. आ. सतेज पाटील म्‍हणाले, साडेपाच लाख दूध उत्पादक जिल्ह्यातील व कर्नाटकातील दोन लाख लिटर दूध गोकुळला येते. या सगळ्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी निगडीत असल्याने मुद्द्याला धरून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत.

शेवटी आम्हाला गट म्हणून ही निवडणूक लढवावी लागली. गोकुळ हा कोल्हापूरच्‍या मातीतील संघ आहे. त्‍यामुळे तो कोल्हापुरातल्या विचारानेच चालला पाहिजे. मुंबईतल्या रिमोट कंट्रोलवर चालला नाही पाहिजे, ही आमची भूमिका असल्‍याचे सांगितले. यावेळी आ. पाटील यांनी आ. गणेश हुक्‍केरी यांच्‍या कार्याचे कौतुक केले. यावेळी मंदिर कमिटी व आ. गणेश हुक्केरी यांच्यावतीने आ. सतेज पाटील यांचा चांदीचा हत्ती, शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी कोल्हापूरचे महेश सरनाईक, गिरीश देशमुख, धैर्यशील घाटगे, गौरव सावंत, दिनेश पर्वती -पाटील, रामगौडा सणलचापगोळ, भीमा सणलचापगोळ, सचिव कुमार पाटील, मल्लू हवालदार, अशोक खाड, बाळकृष्ण दोडलचापगोळ, बसवराज माळगे, अजित सणलचापगोळ, पांडुरंग सणलचापगोळ, अनिल माने, रामा माने , शिवा खानापुरे, अण्णाप्पा असोदे , भीमा वडराळे, संजू खीराई यांच्यासह इतर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news