योजनांसाठी निधी मंजूर करा; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

योजनांसाठी निधी मंजूर करा; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी (दि. 3) प्रथमच नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी केंद्राकडून राज्याला विविध योजनांसाठी निधी पुरवण्याची मागणी केली. त्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, भुपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेऊन चर्चा केली.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह राज्याचे मंत्री काँग्रेसच्या बैठकीसाठी बुधवारपासून (दि. 2) दिल्लीत आहेत. गुरुवारी त्यांनी विविध खात्यांच्या केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी संसद भवनात पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. त्यांना म्हैसुरी पगडी, चंदनाचा हार, शाल आणि अंबारी असलेला चंदनाचा हत्ती भेटीदाखल दिला. त्यानंतर वेगवेगळ्या योजनांतून कर्नाटकाला मिळणार्‍या निधीबाबत चर्चा करून तो त्वरित देण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी म्हैसूरमधील ऐतिहासिक दसरा महोत्सवात एअर शो आयोजित करावा, अशी मागणी केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही भेट घेऊन विविध मुुद्यांवर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव गोविंदराजू, सरकारचे दिल्ली प्रतिनिधी टी. बी. जयचंद्र उपस्थित होते. केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींची भेट घेऊन त्यांनी बंगळूर, म्हैसूर शहरांना भेडसावणार्‍या वाहतूक समस्यांबाबत चर्चा केली. यावर गडकरी यांनी केंद्रीय पथक पाठवून वाहतूक कोंडीबाबत पाहणी करण्यात येईल. त्यांच्या अहवालानंतर उपाययोजना आखण्याचे आश्वासन दिले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news