Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस आज बेळगावात

‘लोकशाही वाचवा अभियानां’तर्गत साधणार संवाद
Devendra Fadnvis
Devendra FadnvisPudhari
Published on: 
Updated on: 

बेळगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (दि. २८) बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. भाजपच्या ‘लोकशाही वाचवा! अराजकता दूर करा!’ या विषयावर ते शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. धर्मनाथ भवनात दुपारी ३.३० वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. लोकशाहीचे संरक्षण आणि देशाची सुरक्षा या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.

विरोधकांकडून होणारा अपप्रचार आणि देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह खासदार जगदीश शेट्टर आणि कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री डॉ. सी. एन. अश्वथनारायण उपस्थित राहतील. शहरातील सुमारे ७०० मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.