

बेळगाव : बोरगाव येथील बॅरेज रोडवरील लक्ष्मी शेतानजीक बुधवारी दुपारी? ? आग लागल्याने सुमारे 40 एकरातील ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. या घटनेत अभिनंदन पाटील, उत्तम पाटील, बाबासाब पाटील, सुरेश पाटील, कुमार पाटील, राजू माणकापुरे ,अभय मानकापुरे, सुभाष मिनचे, राजश्री कलीमणी, राजू हवले, अण्णासाहेब हवले, किशोर महाजन, सुभाष सोमाने, अमित बंकापुरे, हर्षद हवले, पोपट टोणे, महावीर हवले, कुमार नांगरे,? ?
सिदगोंडा पाटील, शांतीनाथ पाटील, गुंडूराव टारे आदी शेतकर्यांचे सुमारे 60 लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. आग लागल्याचे समजतात काही शेतकर्यांनी सदलगा? ? अग्निशामक दलास कळविले. पण अग्निशामक बंबमध्ये निम्म्याहून कमी पाणी होते. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यास विलंब झाला. नजीकच्या शेतातील उसालाही आग लागली. त्यामुळे? ?
शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले.? अरिहंत शुगर्सचे एमडी अभिनंदन पाटील यांनी तत्काळ कारखान्याच्या शेती विभागीय अधिकार्यांना घटनास्थळी पाठवून? ? उसाची ताबडतोब तोडणी करण्यास सांगितले. शेती अधिकार्यांनी भेट देऊन ऊस तोडणीसाठी यंत्रणा राबविली.