

पणजी : नोकर भरतीतील गैरव्यवहारप्रकरणी विरोधी पक्ष आक्रमक झाले असतानाच नगर नियोजन, आरोग्य, महिला आणि बालविकास, वने आणि शहरी विकासमंत्री विश्वजित राणे यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. बोगस नियुक्तीपत्रे दिल्याप्रकरणी संबंधितांवर त्वरित कठोर कारवाई करण्याचे निर्देश खाते प्रमुखांना दिले आहेत. त्यामुळे खातेप्रमुख अज्ञातांविरोधात आपली बनावट सही केल्याची पोलिस तक्रार दाखल करणार आहेत.