चिकोडी : भाजप नगरसेविकेच्या पतीवर गोळीबार; पतीचा मृत्यू

चिकोडी : भाजप नगरसेविकेच्या पतीवर गोळीबार; पतीचा मृत्यू
Published on
Updated on

चिकोडी; पुढारी वृत्तसेवा : अज्ञात हल्लेखोराने भाजप नगरसेविकाच्या पतीवर गोळीबार केला. या घटनेत भाजप नगरसेविकेच्या पतीचा खून केल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील चडचण शहरात घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भीमा काठावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशोक मल्लाप्पा गंटगल्ल असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

याबद्दल अधिक माहिती अशी की, चडचण शहरातील नगरसेविकेचे पती अशोक गंटगल हे खून व इतर खटल्यांमध्ये तुरुंगात शिक्षा भोगत होते. नुकतीच त्यांची तुरुंगातून प्यारेलवर सुटका झाली आहे. रौडी शिटर असलेले अशोक हे चडचन शहरातील निवर्गी रोड जवळून शहरात जात असताना अज्ञात मारेकरांनी त्यांचा पाठलाग केला. यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये त्यांचा तीन गोळ्या लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरासह परिसरात एकच खळबळ मजली आहे.

मृत अशोक यांची पत्नी चडचण महानगरपालिकेच्या भाजपच्या नगरसेविका आहेत. अशोक यांच्यावर अनेक गुन्हे असून, जुन्या वैमन्यासातून कोण झाल्याचे संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच चडचण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी चडचण पोलीस स्थानकात नोंद झाला असून पुढील तपास सुरू आहे. नेहमी कुख्यात गुन्हेगारीमुळे प्रसिद्ध असणारा भीमा काठ या घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आला आहे. तर या घटनेमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news