Bengaluru Bitcoin scam: बीटकॉईन घोटाळा; सूत्रधारासह तिघांना अटक

ईडीची कारवाई : सरकारी पैसा बेकायदेशीर खात्यांमध्ये हस्तांतरित केल्याचा आरोप
Bengaluru Bitcoin scam: बीटकॉईन घोटाळा;  सूत्रधारासह तिघांना अटक
Published on
Updated on

बंगळूर : राज्यात खळबळ माजवणाऱ्या बीटकॉईन घोटाळ्याचा तपास तीव्र करणाऱ्या ईडी अधिकाऱ्यांनी या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार श्रीकृष्ण उर्फ ​श्रीकी याच्यासह रॉबिन खंडेवाल व सुनील हेगडे यांना अटक केली आहे. श्रीकी याच्यासह त्याच्या साथीदारांवर राज्य सरकारच्या ई-प्रोक्योरमेंट वेबसाइट हॅक करून सरकारी पैसा विविध बेकायदेशीर खात्यांमध्ये हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. त्यामुळे, राज्य सरकारने हे प्रकरण तपासासाठी एसआयटीकडे सोपवले होते.

एसआयटीच्या तपासादरम्यान अनेक डिजिटल वॉलेटची चोरी उघडकीस आली असून या नेटवर्कशी नलपाडचाही संबंध असल्याचे आढळून आल्याने नलपाड यापूर्वी दोनदा एसआयटीसमोर हजर झाला आहे. आता ईडी अधिकाऱ्यांनी श्रीकीला अटक केल्यामुळे ते मनी लाँड्रिंग प्रकरणात नलपाडच्या भूमिकेसंदर्भात कागदपत्रे गोळा करत आहेत.

गेल्या महिन्यात ईडीने आमदार हॅरिस व नलपाड यांच्या निवासस्थानांवर छापा टाकला. दरम्यान, श्रीकीने हॅक केलेले बीटकॉईन्स पैशांत रुपांतरित करून ते लेयरिंग सिस्टीमद्वारे हस्तांतरित केल्याचे आढळून आले. श्रीकी हा नलपाडचा भाऊ उमर नलपाडचा वर्गमित्र असल्याचे कळते आहे. श्रीकीने मुंबईतील एका व्यक्तीमार्फत नलपाडच्या खात्यात १० लाख रुपये हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. एकूण ४.५ कोटी रुपये बेकायदेशीर व्यवहारांचा हा एकूण संशय आहे.

दरम्यान, एसआयटीने दिलेल्या माहितीनुसार ईडीने आता श्रीकीला ताब्यात घेतले आहे. श्रीकीने दिलेली विधाने नलपाडसाठी अडचणीची ठरु शकतात. राज्य सरकारच्या पैशांच्या व डिजिटल मालमत्तेच्या लुटीत कोण सहभागी होते. हे आता ईडीच्या तपासात उघड होणे आवश्यक आहे. सध्या, श्रीकीच्या अटकेमुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील संशयीत सुनीश हेगडे व प्रसाद शेट्टी यांच्यासह इतरांनी एप्रिलमध्ये त्यांच्याविरुद्ध दाखल झालेले फसवणुकीचे गुन्हे रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली असून त्यावर आता सुनावणी सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news