Belgaum Highway News : महामार्गाच्या कमकुवतपणामुळे चौघे निलंबित

निपाणीतील महामार्गाच्या निकृष्ट कामाचा फटका
Belgaum Highway News
Belgaum Highway News
Published on
Updated on

निपाणी : शहरातून जाणाऱ्या पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामातील निकृष्ट दर्जाचे काम आणि संरक्षक भित कोसळल्याप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरनाने (एनएचएआय) चौघांवर कठोर कारवाई केली आहे. याप्रकरणी कुमार, अजित, गोहेन, जगदीश या चौघांवर निलंबनाची कारवाई आली असून संबंधितांना स्वतंत्र नोटीस बजावली आहे.

Belgaum Highway News
Belgum news | महाराष्ट्राची माणुसकी; चिखली धरणातून वेदगंगेत पाणी

निपाणी शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. बुधवारी झालेल्या पावसामुळे महामार्गागतची रिटेनिंग वॉल (संरक्षक भित) अचानक कोसळली. विशेष म्हणजे महामार्गावरील वाहतूक सुरू होण्यापूर्वीच ही घटना घडल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला होता. संरक्षक भित कोसळल्याने मोठ्या प्रमाणात माती रस्त्यावर आली होती. त्यामुळे वाहनधारकांना धोका निर्माण झाला. या घटनेची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरनाने चौकशी केली. कामाच्या देखरेखीत हलगर्जीपणा आणि भरावाकामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबधितांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Belgaum Highway News
Inspirational Story | जिद्दीच्या पावलांनी जंगल चिरत आलेलं यश! सविताचा प्रेरणादायी प्रवास

निपाणीतील सहापदरीकरणाचे काम एस.एम.अवताडे कंपनीकडून सुरू आहे. संरक्षक भित कोसळल्यामुळे या कामाची तांत्रिक गुणवत्ता तपासण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. दरम्यान, बुधवारी भराव ढासळल्यानंतर घटनास्थलळी आ. शशिकला तोल्ले, शेतकरी कामगार पक्षाचे उपाध्यक्ष रोहन साळवे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भेट देऊन याबाबत तीव्र संताप व्यक्त करून रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून जाब विचारला होता

दरम्यान, लागलीच एनएचएआयने शुक्रवारी चौघांवर निलंबनाची कारवाई करून महामार्गाच्या कामावर देखरेख ठेवणाऱ्या यंत्रणेला जबाबदार धरण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निलंबनानंतर संबंधित कामाची पुढील तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर आणखी कोणती कारवाई होणार का, याकडे निपाणीसह सीमाभाग व वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.

भरानंतर आता गटारीचा स्लॅब कोसळला

निकृष्ट कामाचा संशय : सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

निपाणी : राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामदरम्यान गтарыवरील स्लॅब कोसळल्याची घटना शुक्रवारी संगम पॅराडाईज हॉटेलसमोर घडली. विशेष म्हणजे, याच तापूट दोन दिवसांपूर्वी भराव घातलेला काही भाग कोसळला होता. अवघ्या दोन दिवसांत घडलेल्या या दुसऱ्या घटनेमुळे महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून वाहनधारक व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

राष्ट्रीय महामार्गालगत सध्या विविध विकासकामे सुरू आहेत. संगम पॅराडाईजसमोर गтарыवर टाकण्यात आलेला स्लॅब अचानक कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, महामार्गावरून सतत मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असल्याने अशा प्रकारच्या घटनेमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Belgaum Highway News
Dog bite rabies death | कुत्र्याने चावल्यानंतर रेबीज लस न घेतल्यामुळे युवकाचा मृत्यू

दोन दिवसांपूर्वी महात्मा गांधी रुग्णालयातील परिसर भराव कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता गтарыवरील स्लॅबही कोसळल्याने संबंधित कामासाठी वापरण्यात आलेले साहित्य, बांधकामाची पद्धत आणि कामाचा दर्जा याबाबत नागरिकांकडून शंका उपस्थित केली जात आहे.

दरम्यान, कोसळलेल्या स्लॅबमुळे परिसरात धोका निर्माण झाला असून प्रशासनाने तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने या घटनेची चौकशी करून जबाबदार ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Belgaum Highway News
पीएसआय भरती गैरव्यवहार प्रकरण : ब्लू टूथद्वारे सांगितली उत्तरे

तातडीने पाहणी करण्याची मागणी

महामार्गाचे काम दर्जेदार आणि नियमानुसार होत असेल तर दोन दिवसांत एकाच ठिकाणी दोन घटना कशा घडतात? एखादी दुर्घटना होऊन जीवितहानी झाल्यानंतर प्रशासन जागे होणार का? संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून कामाची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी नागरिकांनी केली.

logo
Pudhari News
pudhari.news