Chicken Dispute Murder Case| चिकन तुकड्यासाठी केला मित्राचा खून
बेळगाव : पार्टीच्या वेळी चिकन खाण्यावरुन दोघा मित्रांमध्ये वाद झाला. या वादातून एकाने मित्राचा चाकूने वार करुन खून केला. जिल्ह्यातील यरगट्टीत घडलेल्या या खून प्रकरणी मरगोड पोलिसांनी खुन्याला अटक केली. विनोद चंद्रशेखर मलशेट्टी (वय 30, रा. यरगट्टी) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी विठ्ठल मुदकाप्पा हारुगोप्प (वय 28, रा. यरगट्टी) याला अटक केली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, उपरोक्त दोघांचा मित्र अभिषेक कोप्पद याचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले आहे. यानिमित्त त्याने यरगट्टीपासून काही अंतरावर असलेल्या आपल्या शेतात पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी अनेक मित्र पार्टीसाठी उपस्थित होते. सर्वांच्या प्लेटमध्ये विठ्ठल हा चिकनपीस घालत होता.
यावेळी बाजूलाच प्लेटमध्ये कांदा कापण्यासाठी चाकू ठेवला होता. रागाच्या भरात तो चाकू घेऊन विठ्ठलने विनोदवर हल्ला चढवला. विनोदला वर्मी घाव लागल्याने तो ठार झाला. या प्रकरणी मुरगोड पोलिसांत नोंद झाली आहे. पोलिसांनी संबंधीत संशयिताला अटक केली आहे.
