बेळगाव : महापालिकेने हायग्रिवा कंपनीला 12 कोटी 40 लाख रुपये देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने नेमलेल्या लवादाने शनिवारी (दि. 12) दिला आहे. त्यामुळे, महापालिकेला मोठा दणका बसला आहे.
हायग्रिवा कंपनीने महापालिकेविरुद्ध 35 कोटी रुपयांचा दावा दाखल केला होता. 2008 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी सुरु केलेल्या शहरी उत्थान योजनेंतर्गत शहरातील विकासकामांसाठी 100 कोटी रुपये मंजूर केले होते.
प्रकल्प सुरु होण्यास झालेला विलंब आणि मंजूर योजनांमधील बदलांमुळे कंपनीला वाढीव खर्च सहन करावा लागला. कंपनीने नंतर नुकसानभरपाई मागितली. 2021 मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात दावा दाखल केला. न्यायालयाने नियुक्त केलेल्या लवादाने दीर्घ सुनावणीनंतर कंपनीला 12 कोटी 40 लाख रुपये देण्याचा निर्णय दिला.