बेळगाव : कृष्णा नदीतून वाहून आला महिलेचा मृतदेह

बेळगाव : कृष्णा नदीतून वाहून आला महिलेचा मृतदेह

चिकोडी : पुढारी वृत्तसेवा : चिकोडी तालुक्यातील येडूर येथे कृष्णा घाटावर एका महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना आज (दि.१२) घडली. कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी येथील सुशीला तातोबा अनूजे (वय ६८) यांचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले आहे. या महिलेने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांनी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी अंकली पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. सध्या चिकोडी तालुक्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्यातच आज कृष्णा नदीतून महिलेचा मृतदेह आढळल्याने येडूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news