बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरातील काही सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना कच्च्या केळ्यांचे वाटप केले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. केळी कच्ची मिळत असल्याने काही विद्यार्थी ती नाकारत आहेत. तर काहीजण अर्धवट खाऊन फेकून देत असल्याचे प्रकार घडत आहेत. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाची केळी उपलब्ध करून दिली जावीत, अशी मागणी पालकांतून केली जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचे कुपोषण दूर व्हावे, म्हणून अंडी, केळी व चिक्कीचे वाटप केले जाते. अजिम प्रेमजी फाऊंडेशनच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना कच्च्या केळ्यांचे वाटप केल जात असल्याने पालकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. या कच्च्या केळ्यांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही विद्यार्थी केळी खाण्यास नकार देत आहेत. तर काही विद्यार्थी अर्धवट खाऊन कचराकुंडीत फेकत आहेत. शिक्षण खात्याने याची गांभीर्याने दखल घेऊन विद्यार्थ्यांना चांगली पिकलेली दर्जेदार केळी वाटप केली जावी, अशी मागणी पालकवर्गातून केली जात आहे. शिक्षण खात्याने या हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे, अशी मागणी पालक किसन सुंठकर यांनी केली आहे.
काही सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना कच्च्या केळ्यांचे वाटप केले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. केळी कच्ची मिळत असल्याने काही विद्यार्थी ती नाकारत आहेत. तर काहीजण अर्धवट खाऊन फेकून देत असल्याचे प्रकार घडत आहेत. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाची केळी उपलब्ध करून दिली जावीत, अशी मागणी पालकांतून केली जात आहे.