बेळगाव : सौंदलग्याजवळ महामार्गावर ओढ्याचे पाणी

वाहतूक पर्याय मार्गाने वळविली
Belgaum highway flooding
महामार्गावर ओढ्याचे पाणी
Published on
Updated on

निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगा गावच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या भुयारी मार्गाच्या दुतर्फा महामार्गावर ओढ्याचे पाणी आल्याने आंतरराज्य वाहतूक सोमवारी रात्री 8 वाजता बंद होऊन रात्री उशिरापर्यंत विस्कळीत झाली. ही वाहतूक मांगूर फाटा व आप्पाचीवाडी मल्लय्या डोंगरमार्गे तर चार चाकी, लहान वाहने सौंदलगा रेणुका मंदिर रोडमार्गे वळवण्यात आली.

Belgaum highway flooding
देशातील उदयोन्मुख शहरांच्या यादीत बेळगाव

सौंदलगा गावच्या प्रवेशद्वारावर असलेल्या ओढ्याला मल्लय्या डोंगर परिसरातून आलेल्या ओढ्याचे पाणी येते. हा ओढा पुढे वेदगंगेला जाऊन मिळतो. दरम्यान सोमवारी सायंकाळी सहानंतर परिसरात मेघगर्जनेसह वादळी पाऊस झाल्याने या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले. त्यामुळे दोन्ही बाजूच्या महामार्गावर किमान ओढ्याच्या टप्प्यात चार ते पाच फूटाने पाणी वाहू लागले होते. त्यामुळे प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोल्हापूरहून-बेळगावकडे तर बेळगावहून-कोल्हापूरकडे होणारी आंतरराज्य वाहतूक रोखून धरली.

यावेळी घटनास्थळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी, औताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक अक्षय सारापुरे यांच्यासह पोलिस कर्मचारी यांनी दोन्ही बाजूंनी होणारी आंतरराष्ट्रीय वाहतूक आडी मल्लय्या डोंगर मार्गे आडी क्रॉस सौंदलगा बेघर वसाहत मांगुर फाटा अशी सुरू करून दिली.

Belgaum highway flooding
बेळगाव : मराठी भाषा विद्यार्थ्यांनी न्यूनगंड दूर करावा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news