देशातील उदयोन्मुख शहरांच्या यादीत बेळगाव

सर्वेक्षणातील निष्कर्ष : जागतिक क्षमता केंद्र बनण्याची ताकद
नकाशात भगव्या रंगाने दर्शविलेली उदयोन्मुख शहरे.
नकाशात भगव्या रंगाने दर्शविलेली उदयोन्मुख शहरे. Pudhari
Published on
Updated on

बेळगाव : देशातील वेगाने विकास होण्याची क्षमता असलेल्या सहा उदयोन्मुख शहरांमध्ये बेळगावचा समावेश झाला आहे. झिनोव्ह या फर्मन सर्वेक्षण करुन प्रसिद्ध केलेल्या 'इंडिया टियर-२ आणि उदयोन्मुख शहर विश्लेषण' अहवालातून ही बाब पुढे आली आहे. बेळगावसह सुरत, नाशिक, हुबळी-धारवाड, वारंगल आणि तिरुचिरापल्ली शहरांमध्ये वेगाने विकास होण्याची क्षमता असल्याचे अहवालात म्हटले आहे.

अहवालाला महत्व

Summary

झिनोव्ह ही २००२ मध्ये स्थापन झालेली एक जागतिक व्यवस्थापन सल्लागार फर्म आहे. कंपनीची कार्यालये न्यूयॉर्क, पॅरिस, ह्युस्टन, पुणे, हैदराबाद आणि बंगळूरसारख्या जगातील प्रमुख शहरांमध्ये आहेत. गेल्या दोन दशकांपासून हो फर्म जागतिक उपक्रमांसह फॉर्च्यून २००० कंपन्यांना धोरणात्मक वाढीसंदर्भात मार्गदर्शन करत असल्याने अहवालाला महत्व प्राप्त झाले आहे.

अहवालासाठी सर्वेक्षण करताना द्वितीय श्रेणी (टियर-२) शहरांमधील जागतिक क्षमता केंद्रांच्या (ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स) विस्तारावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. सध्या देशात जागतिक क्षमता केंद्रांचा दर्जा असलेली २० द्वितीय श्रेणी शहरे आहेत. त्यात अहमदाबाद, कोलकाता, कोईम्बतूर, चंदीगड, बडोदा, इंदूर, जयपूर, लखनौ, म्हैसूर, तिरुवनंतपुरम, भुवनेश्वर, कोची, विज्ञाग, सेलम, मंगळूर, गोवा, मदराई, नागपूर, औरंगाबाद आणि तिरुनेलवेलीचा समावेश आहे. त्यात समाविष्ट होण्याची क्षमता वेळगावसह वरील सहा शहरांमध्ये असल्याचे अहवालात नमूद आहे.

उदयोन्मुख शहरे ठरविण्यासाठीच्या प्रतिभा (टॅलेंट) उपलब्धता या निकषात बेळगाव चौथ्या क्रमांकावर आहे. शहर परिसरात अभियांत्रिकी महाविद्यालयांची मजबूत साखळी असल्याने ते शक्य झाले आहे. शहरात अभियांत्रिकी, संशोधन आणि विकास क्षेत्रात २० ते ५०

हजार मनुष्यबळ उपलब्ध आहे. तर माहिती तंत्रज्ञान, व्यवसाय प्रक्रिया व्यवस्थापन (बीपीएम) आदी क्षेत्रांमध्ये २० हजारांपेक्षा कमी लोक कार्यरत आहेत. प्रतिभेसह दळणवळण (कनेक्टीव्हिटी) हीसुद्धा बेळगावची एक जमेची बाजू आहे. याबाबतीत शहर तिसऱ्या स्थानावर आहे.

हवाई, रस्ते आणि रेल्वे पायाभूत सुविधा चांगल्या विकसित झाल्या असल्याने संपर्क सोपा असून प्रतिभा संपादनासाठी बाब महत्त्वाची आहे. राहणीमानाचा दर्जाही अत्युच्व आहे. याबाबतीत शहराचा क्रमांक तिसरा आहे. बेळगावसारखी उदयोन्मुख शहरे व्यापक जागतिक क्षमता केंद्र परिसंस्थेचा कसा अविभाज्य भाग बनत आहेत, है झिनोव्हच्या अहवालातून स्पष्ट होते. या शहरांमध्ये प्रथम श्रेणी दर्जा मिळविण्याची क्षमता आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news