Pudhari Tours and Travels Exhibition Belgaum: चला मराठा मंदिरला!

‘पुढारी’तर्फे आजपासून पर्यटन एक्स्पो; पर्यटनाचे असंख्य पर्याय एकाच छताखाली
Pudhari Tours and Travels Exhibition
Pudhari Tours and Travels Exhibition
Published on
Updated on

बेळगाव : पर्यटनप्रेमी ज्या क्षणाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात, त्या बहुप्रतीक्षित ‘गगन टूर्स’ प्रस्तुत दैनिक 'पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन्स २०२६ ‘पॉवर्ड बाय’ अ हेवन हॉलिडेला शुक्रवारपासून (दि. २१) तीन दिवस बेळगावातील मराठा मंदिरमध्ये दिमाखात प्रारंभ होत आहे. एकाच छताखाली देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे असंख्य पर्याय उपलब्ध होत असल्याने सुट्टीच्या काळात कुठे आणि कसे फिरायचे याचा प्लॅन करणाऱ्यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे माहितीचा आणि नवनवीन पर्यायांचा खजिना ठरणार आहे.

प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य असून पर्यटनप्रेमींना सहकुटुंब लाभ घेता येणार आहे. शुक्रवार (दि. २१), शनिवार (दि. २२) आणि रविवार (दि. २३) सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत प्रदर्शन खुले असणार आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता आमदार अभय पाटील, रोटरीचे माजी प्रांतपाल अविनाश पोतदार, बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बी. जे. गंगाई, मराठा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव, गगन टूर्स बेळगावचे संचालक संजय कुगजी, गगन टूर्स कोल्हापूरचे योगेश सोनटक्के, अ हेवन हॉलिडे कोल्हापूरच्या संचालिका प्रणिता बुगडे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

काश्मीरमधील निसर्गरम्य दऱ्यांपासून ​ते केरळमधील बॅकवॉटरपर्यंत, राजस्थानच्या ऐतिहासिक किल्ल्यांपासून ते गोव्याच्या आकर्षक किनाऱ्यापर्यंत अनेक पर्याय येथे उपलब्ध असणार आहेत. एवढेच नव्हे, तर परदेशी पर्यटनस्थळांचीही माहिती येथे उपलब्ध असेल. बजेटमध्ये प्रवास करू इच्छिणाऱ्यांपासून ते लक्झरी पर्यटन शोधणाऱ्यांपर्यंत प्रत्येकासाठी काहीतरी खास ऑफर इथे असणार आहे.

पर्यटनतज्ज्ञांशी संवादाची संधी

हनिमून पॅकेजेस अशा विविध श्रेणींमध्ये माहिती आणि बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे. पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची आणि आपल्या प्रवासाचे नियोजन करण्यासाठी उपयुक्त टिप्स मिळवण्याची संधीही मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news