

बेळगाव ः शहरातील टिळकवाडी परिसरात दोन व उद्यमबाग परिसरात एक घरफोडी केलेल्या घरफोड्याला टिळकवाडी पोलिसांनी अटक केली. जमशेदखान लखील खान (वय 41, मूळ रा. हैदराबाद, सध्या रा. गोवा) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून 13 लाख रुपये किंमतीचे 115 ग्रॅम सोन्यासह दुचाकी व मोबाईल जप्त केले.
सदर चोरट्याने तीन ठिकाणी घरफोड्या केल्या होत्या. या प्रकरणी त्याला अटक केली. त्याच्याकडून 60 ग्रॅमची सोन्याची बिस्कीटे व 55 ग्रॅमचे दागिने असा 115 ग्रॅम सोने जप्त केले. याशिवाय 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी, 7,500 रुपये किंमतीचा मोबाईलही जप्त केला. याची एकूण किंमत 13 लाख 50 हजार रुपये होते. टिळकवाडीचे निरीक्षक परशुराम पुजेरी व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.