बेळगाव : विजेच्या धक्क्याने पेपर विक्रेत्या मुलाचा मृत्यू

बेळगाव : विजेच्या धक्क्याने पेपर विक्रेत्या मुलाचा मृत्यू

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : कुटुंबाला आर्थीक हातभार लावण्यासाठी पेपर विक्रीचं काम करणाऱ्या १४ वर्षाच्या रजत गौरव नावाच्या मुलाचा विजेच्या धक्क्याने बेळगावात  मृत्यू झाला. आज (दि.१४) सकाळी पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची नोंद टिळकवाडी पोलीस स्थानकात झाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रघुनाथ पेठ अनगोळ येथे राहणारा व मुळचा उ. प्रदेश येथील रजत गौरव हा दररोज सकाळी हिंदवाडी परिसरात पेपर टाकण्याचे काम करत. आज सकाळी नेहमीप्रमाणे तो गोमटेश जवळून भाग्यनगरकडे जाणाऱ्या मार्गावरील एका बंगल्यात पेपर टाकण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला बंगल्याच्या आवाराच्या जाळीतून वाहणाऱ्या वीज प्रवाहाचा जबर धक्का बसला. सदर घटनेत रजत गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच रजतचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच काही पेपर विक्रेत्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news