Belgaon News : वकील विद्यार्थ्याने जीवन संपवले

गणेशपूरमधील हॉस्टेलमध्ये घटना : वडिलांकडून संशयास्पद मृत्यूची फिर्याद
Law Student Death
Law Student Deathpudhari photo
Published on: 
Updated on: 

बेळगाव: वकिलीच्या चौथ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली. शंकर सिद्दनगौडा सत्तीनगौडर (वय २६, मूळ रा. चिम्मलगी, ता. गुळेदगुड्डू जि. बागलकोट) असे मृताचे नाव आहे. त्याच्या वडिलांनी वडगाव पोलिसांत फिर्याद दिली असून यामध्ये मुलाच्या - आत्महत्येबाबत संशय व्यक्त केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शंकर हा येथील बेल्लद लॉ कॉलेजमध्ये एलएलबीच्या चौथ्या वर्षात शिकत होता. तो अभ्यासासाठी गणेशपूर येथील बीसी हॉस्टेलमध्ये राहात होता. काही विषयात नापास झाल्याने तो हॉस्टेलमध्ये राहून अभ्यास करत होता.

Law Student Death
Vijapur Crime : पायावर गोळी झाडून मुख्य आरोपीला अटक

शुक्रवारी सायंकाळी सहा ते नऊच्या सुमारास त्याने आपल्या राहत्या खोलीत टॉवेल व लुंगी एकत्रित बांधून ती पंख्याला बांधून त्याद्वारे गळफास घेतल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून येते.

वडिलांकडून संशय

मृताचे वडील सिद्दनगौडा पामनगौडा सत्तीगौडर यांनी याबाबतची फिर्याद वडगाव पोलिसांत दिलेली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आपल्या मुलाने ज्या खोलीत आत्महत्या केली त्या खोलीसमोर सीसीटीव्ही कॅमेरा नाही. त्याच्या खोलीत असणारे अन्य विद्यार्थी आपण गावी जाणार असल्याचे सांगत असले तरी ते गावी गेलेले नाहीत. हे सर्वजण खोटे बोलत असल्याने आपल्याला मुलाच्या आत्महत्येबाबत संशय असल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

Law Student Death
Nanded News : येळेगाव-माळकौठ्यातील दोन कुटुंबांना रा.काँ.च्या आमदारांचा मदतीचा हात!

वडगाव पोलिसांनी त्यानुसार नोंद करून घेतली आहे. परंतु, वडिलांनी संशय व्यक्त केल्याने पोलिस निरीक्षक नागनगौडर कट्टीमनीगौडर व उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी पुढील सखोल तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.